प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाच्या संकटकाळात भाजीपाल्यांच्या दरात वाढ होत असल्याने गोमंतकीयांना रोजच्या बजेटात काटकसर करावी लागत आहे. गेल्या काही आठवडय़ापासून टोमॅटो, बटाटा, कोथिंबिरीचे दर वाढत आहेत. 20 ते 30 या दरात मिळणारा बटाटा, टोमॅटो आता 60, 50 रूपयाने विकले जात आहेत.
बटाटय़ाचे दर 50 रूपये किलोने असले तरीही बाजारात उत्तम दर्जाचा बटाटा नसून खालावलेल्या दर्जाच्या बटाटय़ाची विक्री केली जात आहे. याशिवाय बाजारात गुणवत्तेनुसार टोमॅटोची विक्री केली जात आहे. लहान टोमॅटो 50 रूपये तर मोठा टोमॅटो 60 रूपये किलोने विकला जात आहे.
मागील काही आठवडय़ातील दराच्या तुलनेत कांदा आणि बटाटय़ाचे दरही वाढले आहेत. बाजारात कांदा 35 ते 40 रूपये तर बटाटा 50 रूपये दराने विकला जात आहे. सध्या बाजारात लहान टोमॅटो 50 रूपये किलो तर मोठा टोमॅटो 60 रूपये किलो, बटाटा 50 रूपये किलो या दराने विकले जात आहे. मागील आठवडय़ात 40 रूपयाने विकला जाणारा कोबी आता 40 रूपयांनी विकला जात आहे. तसेच कारल्यांचे दरही काही प्रमाणात उतरले आहेत. सध्या कारली 50 रूपये किलोने विकली जात आहे. हिरव्या मिरचीचाही तिखटपणा काही प्रमाणात कमी झाला असून सध्या बाजारात 60 रूपये किलोने विकली जात आहे. वालपापडी 80 रूपये किलो, चिटकी 60 रूपये, भेंडी 60 रूपये, भोपळा 20 रूपये, दुधी प्रति नग 60 रूपये, गाजर 60 रूपये, शिमला मिरची 60 रूपये, दोडकी 60 ते 80 रूपये, आले 80 ते 150, लसूण 100-200, मिरची 80 रूपये, फ्लॉवर 40 रूपये प्रति नग, काकडी 40 रूपये किलो या दराने विकली जात आहे. वांगी लहान 40 रूपये, तर मोठी वांगी 50 रूपये, कोथिंबीर 20 रूपये जुडी, मेथी 15 रूपये जुडी, पालक 5 रूपये एक या दराने विकले जात आहेत.









