टोप /वार्ताहर
टोप शियेफाटा येथील अतिक्रमणाचा परीसर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता इराप्पा नाईक आणि एमआयडीसी पोलिसांनी अतिक्रमण मुक्त केला.
शियेफाटा येथुन कोल्हापुर तसेच रत्नागिरीला जाणारा मार्ग आहे. तसेच कोल्हापूरहून महामार्गाला जोडणारा हा मार्ग आहे. शियेफाटा येथे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शियेफाटा येथील अतिक्रमण धारकांना सुचना दिल्या होत्या. आज महामंडळाचे उपअभियंता इराप्पा नाईक यांच्या पथकाने अतिक्रमणे हटविली.
शियेफाटा येथे एमआयडीसीचे निलेश जाधव, कुमार इंगवले, नानासो कोरडे तर फायर ब्रिगेड यु.डी. चव्हाण, बि.बि. वरेकर, आर.एस.सावंत यांनी कारवाईत भाग घेतला होता. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजेश खांडवे, १५ पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.









