मालवण / प्रतिनिधी-
मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या १९८६ मधील दहावी बॕचच्या माजी विद्यार्थ्यांनी कोविड योद्ध्यांसाठी दोनशे फेस शिल्ड नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी नगरसेवक मंदार केणी उपस्थित होते.
मालवण कोविड उपचार केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी शंभर असे दोनशे फेस शिल्ड देण्यात आले. यावेळी टोपीवाला १९८६ बॕच ग्रुप ॲडमिन स्मृती कांदळगावकर, रिझवान शेख, हरी चव्हाण, सुहास खराडे, रवींद्र शिरपुटे, गुरुनाथ माने, दत्तात्रय तांडेल, राजेश कुशे, लीलाधर सारंग आदी उपस्थित होते.









