ऑनलाईन टीम
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरूष हॉकी संघाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनला ३-१ ने पराभूत केलं. जवळपास ४ दशकानंतर भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून १-७ ने पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केलं आहे. अ गटातील ५ पैकी ४ सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. आता उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटेनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे.
उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला ३-१ अशी धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी हे दोन संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव










