ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये एक स्पर्धक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशीरो मुटो यांनी दिली.
टोकियोत 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परदेशातून आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याला 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिक अवघ्या 6 दिवसांवर आली असून, भारतीय खेळाडूही आज टोकियोसाठी रवाना झाले आहेत.