वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या चार मल्लांना कुस्ती प्रकाराच्या ड्रॉ मध्ये सिडिंग देण्यात आले आहे.
भारताच्या बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांना अनुक्रमे 65 आणि 86 किलो गटात दुसरे सिडिंग मिळाले आहे. 57 किलो गटात रवीकुमारला चौथे सिडिंग मिळाले आहे. महिलांच्या विभागात भारताच्या विनेश फोगटला 53 किलो वजन गटात टॉप सिडिंग देण्यात आले आहे. 65 किलो पुरूषांच्या गटात रशियाच्या गेडझिमुरादला तसेच 57 किलो गटात सर्बियाच्या मिकीकला तर 86 किलो गटात इराणच्या हसनला टॉप सिडिंग देण्यात आले आहे.









