वृत्तसंस्था/ टोकियो
2021 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक क्रीडाज्योत सार्वजनिक प्रदर्शनार्थ येथील ऑलिंपिक म्युझियममध्ये 1 सप्टेंबरपासून ठेवण्यात येणार असल्याची माहिती जपानच्या ऑलिम्पिक समितीने सोमवारी दिली.
ग्रीसमधून ऑलिंपिक ज्योतीचे जपानमध्ये आगमन झाल्यानंतर फुकुशिमा येथे या क्रीडा ज्योतीचे शेवटचे दर्शन घडले होते. ऑलिंपिक क्रीडाज्योतीचा जपानचा दौरा सुरू होण्यापूर्वी कोरोना महामारी संकटामुळे रद्द करावा लागला. 2020 साली होणारी टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर स्पर्धा आता 2021 साली घेतली जाईल. तथापि जपानच्या ऑलिंपिक म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली क्रीडाज्योत पुढील वर्षांपर्यंत कशी सुखरूप राखता येईल यासाठी स्पर्धा आयोजकांनी इतर काही स्पर्धा संबंधित व्यक्तींशी चर्चा केली. या चर्चेनंतर टोकियो ऑलिंपिक क्रीडाज्योतीचा डिसप्ले नॅशनल स्टेडियमच्या शेजारी असलेल्या जपान ऑलिंपिक म्युझियममध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑलिंपिक क्रीडाज्योतीचा डिसप्ले 1 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान राहील, असे सांगण्यात आले.









