टोकियो \ ऑनलाईन टीम
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. टोकियोमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी 12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं ऑलिम्पिक खेळांचा आनंद प्रत्यक्ष मैदानावर जाऊन लुटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी शुक्रवारी टास्क फोर्सच्या बैठकीत तिसऱ्या आणीबाणीला औपाचारिकपणे मंजुरी दिली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, टोकियो, ओसाका, क्योटो आणि ह्योगो प्रांतात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान बार तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येणार आहेत. जपानमध्ये पुढील आठवड्यापासून ‘गोल्डन वीक’ची सुट्टी सुरू होणार आहे. त्या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या काळात जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोरोनामुळं पुढे ढकलली होती. आता ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे. या ऑलिम्पिकसाठी विदेशी प्रेक्षकांना येण्यासाठी आधीच बंदी घातली होती. मात्र आता आणीबाणी लागू केल्यामुळं टोकियोमधील स्थानिक प्रेक्षकांना येण्यास देखील बंदी असणार आहे. त्यामुळं यंदाचं ऑलिम्पिक प्रेक्षकांविनाच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









