रिलेशनशिपबद्दल फातिमा सनाचा खुलासा
दंगल गर्ल म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री फातिमा सना शेख स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक बोलत नाही. पण अलिकडेच फातिमाने स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल काही खुलासे केले आहेत. टॉक्सिन नात्यात राहिले असल्याचे फातिमाने सांगितले आहे. अलिकडेच फातिमाला नेटफ्लिक्सच्या ‘अजीब दास्तां’मध्ये पाहिले गेले होते.
टॉक्सिक नात्यात असणे अत्यंत अवघड असते. आम्ही हे करू, ते करू असे म्हणतो. पण जेव्हा आपण नात्यात असतो, तेव्हा हे अत्यंत अवघड होऊन बसते. अनेक महिला या समस्येतून जात असतात. विशेषकरून जेव्हा आपण काम करत नसतो आणि आर्थिक स्वरुपात स्वतःच्या पतीवर अवलंबून असतो. एका वाईट वैवाहिक नात्यातून बाहेर पडणे अत्यंत कठिण असते असे उद्गार फातिमाने काढले आहेत.
फातिमा सना शेख काही दिवसांपूर्वी कोरोनाने बाधित झाली होती. अशा स्थितीत अनिल कपूर यांनी तिच्या घरी जेवण पाठविले होते. तत्पूर्वी फातिमाने एक पोस्ट शेअर करत अत्यंत त्रासात असल्याचे म्हटले होते. फातिमा सध्या अनिल कपूर यांच्यासोबत एका चित्रपटात काम करत आहेत.









