विविध मॉडेल्सचा राहणार समावेश- टेस्ला भारतामधील स्थान मजबूत करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एलॉन मस्क यांच्या मालकीची वाहन निर्मिती कंपनी टेस्ला भारतामध्ये विविध ई-कारचे सादरीकरण करण्याचे संकेत आहेत. कंपनीचे ध्येय हे खासगी आणि सार्वजनिक वाहतुक क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल करण्याचे आहे. चालू वर्षाअखेरीपर्यंत कंपनी भारतामध्ये सात ई-कार सादर करण्याचे संकेत असून यामधील काही मॉडेलच्या किमती 60 लाख रुपयापर्यंत राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
यासोबतच टेस्लाची नजर भारतामधील स्वस्त ई-कार, दुचाकी आणि वाहन बाजारावर राहणार आहे. कंपनी पब्लिक ट्रान्सपोर्ट सेगमेंटवर शहरांमधील हायपर लूप नेटवर्कवर काम करत आहे. आगामी काळात टेस्ला भारताला उत्पादन केंद्र म्हणून उदयास आणणार असल्याचे टेस्लाच्या मुख्य अधिकाऱयांनी म्हटले आहे. सदर प्रकल्पांची उभारणी देशभरात होणार असून यातील एक प्रकल्प कर्नाटकमध्येही होणार असून जो वर्षअखेरीपर्यंत सुरु होण्याचा अंदाज आहे. या कारखान्याची क्षमता ही वर्षाला अडीच लाख कार निर्मिती करण्याची होणार आहे. याअनुषंगाने तेथे जवळपास 10 हजार लोकांना रोजगार मिळवून देण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.
सात प्रीमियम ई-कार
टेस्ला भारतामध्ये सात प्रीमियम ई-कार सादर करणार असून यामधील तीन मॉडेल्स स्टॅण्डर्डमधील राहणार आहेत. यामध्ये याची किमत ही 60 लाख रुपये, मॉडेल एसची यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक राहणार असल्याची माहिती आहे.