शांघाई
अमेरिकेतील कंपनी टेस्लाने आपले शांघाईतील कारचे उत्पादन पुन्हा थांबवले असल्याचे सांगितले जात आहे. 19 एप्रिलला काही अंशी शांघाईमध्ये कारचे उत्पादन सुरु करण्यात आले होते. 22 दिवस कोविड-19 लॉकडाऊनमुळे कारखान्याचे काम बंद होते. सध्याला उत्पादनासाठीच्या कच्च्या मालाच्या पुरवठय़ाचा विस्कळीतपणाचा त्रास कंपनीला होत आहे. यातूनच कंपनीचे उत्पादन पुन्हा थांबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.