टेक्सास
अमेरिकेतील एस अँड पी 500 निर्देशांकात आता एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्ला कंपनीचाही लवकरच समावेश होणार आहे. अमेरिकेतील पाचशेहून अधिक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा या निर्देशांकात समावेश असतो. यात आता टेस्लाचेही नाव दिसणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये कंपनीचा एस अँड पी 500 मध्ये समावेश होणार असल्याची माहिती आहे. या घोषणेनंतर सोमवारी डो जोन्सच्या बाजारात कंपनीचे समभाग 12 टक्क्मयांनी वधारले होते.









