प्रतिनिधी / निपाणी
निपाणी येथील हरीनगरनजीक राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या टेम्पो व लक्झरी बस अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 9.15 वाजता घडली. शुभम कांबळे (वय 24, रा. गडहिंग्लज) असे गंभीर जखमी टेम्पो चालकाचे नाव आहे.
नॅशनल ट्रव्हल्सची लक्झरी बस (क्र. केए 51 एए 7137) ही बेंगळूरहून इचलकरंजीकडे जात होती. तेल वाहतूक करणारा टेम्पो (क्र. एमएच 04 सीजी 8854) हा गडहिंग्लजहून कोल्हापूरकडे जात होता. टेम्पोचालक शुभम कांबळे याचा ताबा सुटल्याने टेम्पोने लक्झरी बसला धडक देत टेम्पो दुभाजकावर उलटला. या अपघातामुळे टेम्पोतील तेल रस्त्यावर सांडले होते. या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले.
जखमी शुभमला उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. लक्झरी बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.









