वाई / प्रतिनिधी :
वाई येथील सनई हॉटेल समोरून 30 जूनच्या रात्री टेम्पो आणि जनरेटर चोरीला गेला होता. वाई पोलिसांनी 24 तासात चोरीला गेलेला टेम्पो जनरेटरचा शोध लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
प्रशांत बाळासाहेब गायकवाड (वय 29), भैय्या सिकंदर शेख (34, दोघेही रा. वळण ता.राहूरी जि.अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई येथील हॉटेल सनई शेजारी संतोष सुर्यवंशी यांच्या यश बांबू मर्चंट गोडावून समोर उभा असलेला टेम्पो आणि एक कमीन्स कंपनीचा 125 केव्ही पॉवरचा जनरेटर हा अज्ञात चोरट्याने 30 जूनच्या रात्री चोरून नेला होता. वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या सुचना प्रमाणे व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचारी यांना तांत्रिक माहितीवरुन वळण ता.राहूरी जि.अहमदनगर येथे जाऊन संशयित प्रशांत बाळासाहेब गायकवाड, भैय्या सिकंदर शेख यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरीला गेलेला टेम्पो व कमीन्स कंपनीचा जनरेटर हस्तगत केला. अधिक तपास स.पो.फौजदार रमेश कोळी करीत आहेत.









