- तेलांचा पर्याय : टेनिस एल्बोची समस्या दूर करण्यासाठी इसेन्शिअल तेले खूप प्रभावी ठरू शकतात. गवती चहाच्या तेलाचे 12 थेंब घेऊन ते खोबरेल तेलासारख्या अन्य कुठल्याही तेलामध्ये मिसळून घ्यावे. तेलाचे हे मिश्रण दुखर्या जागेवर लावून त्याने मालिश करावी. अर्धा ते एक तास तेल लावून ठेवावे. नंतर पुसून घ्यावे. असे दिवसातून दोन वेळा दुखर्या जागी लावावे. या तेलामध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे वेदना आणि सूज दूर करण्यास मदत होते.
- हळदीचे दूध : स्नायूंच्या वेदना दूर करण्यासाठी हळद खूपच प्रभावी मानली जाते. एक ग्लास गरम दुधामध्ये एक छोटा चमचा हळद घालावी, मध मिसळावे. दिवसातून एक ते दोन वेळा हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास टेनिस एल्बोची समस्या दूर करता येते. लागलेला मार किंवा जखम भरून येण्याची प्रक्रिया हळदीमुळे वेगाने होऊ लागते त्याचबरोबर सूज आणि वेदना यांच्यापासूनही आराम मिळतो.
- कोरफडीचा रस : एक कप कोरफडीचा रस प्यायल्यास टेनिस एल्बोची समस्या दूर होण्यास मदत होते. टेनिस एल्बोची समस्या दूर करण्यास कोरफडीचा रस हा सर्वात सोपा उपाय आहे. कोरफडीमध्ये जळजळ थांबवण्याचे किंवा अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे प्रभावीपणे जळजळ दूर होण्यास मदत मिळते.
- आहारावर द्या लक्षः टेनिस एल्बोची समस्या दूर करण्यासाठी आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे. आहारात ए आणि सी जीवनसत्त्व देणार्या पदार्थांचे प्रमाण अधिक असावे. ए जीवनसत्त्व कोलेजनचे उत्पादन वाढवण्याबरोबर पेशींच्या दुरूस्तीचेही काम करते. सी जीवनसत्त्व पेशींची वाढ होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









