नवी दिल्ली
ग्राहकांना बजेटमधील स्मार्टफोन्स उपलब्ध करुन देणारी दिग्गज चीनी कंपनी टेक्नोकडून भारतामध्ये नवीन टेक्नो स्पार्क 7 प्रो स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. सदरचा स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा मिळणार आहे. फोनची विक्री ऍमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर 28 मेपासून सुरु होणार आहे. 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजच्या फोनची किमत 9,999 रुपये आहे. 6 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज फोनची किमत 10,999 रुपये आहे. टेक्नो स्पार्क मॉडेलला 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. तसेच 34 दिवसांमध्ये स्टॅण्डबाय बॅकअप मिळत असून 35 तासांपर्यंत कॉलवर बोलण्याची सेवा मिळणार आहे.









