अन्यथा कराड विटा रस्त्यावर रास्ता रोखो करणार
कडेगाव/प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यातील नेर्ली खोऱ्यात गेली दीड महिना झाले टेंभू योजनेचे आर्वतन सुरु होवून बंद झाले. सध्या आर्वतन सुरू करणे गरजेचे आहे. शेतकरी यांच्या विहरींनी तळ गाठला आहे. याबाबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजाराम शिंदे सरकार यांनी कडेगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले नेर्ली अपशिंगे, कोतवडे, खंबाळे, सुर्ली भागात टेभू योजनेचे पाणी 21 फेब्रुवारी ला बंद झाले आहे आज 45 दिवस झाले तरी पाणी चालू केले नाही, भागातील पिके वाळायला लागली आहेत, या भागातील जमिनी हलक्या माळरान जमिनी आहेत, विहिरीचे, बोअर चे पाणी कमी झाले आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, एकतर विजेचा लपंडाव त्यांना कनॉल ला पाणी नाही, शेतकरी हवालदिल झाले आहेत, याकडे कोणीही लक्ष देत नाहीत, असे समजते कि या भागात येणाऱ्या पंपहाऊस मधील चालू साहित्य काढून दुसऱ्या कॅनॉल ( फाट्यावर ) बसवलंय, कारण दुसऱ्या फाट्याच साहित्य खराब झाल्यामुळे या फाट्यावरच चालू साहित्य काढून दुसरीकडे बसवलंय,ही चर्चा भागात चालू आहे, खरं काय खोटं काय पण गेल्या 45 दिवसापासून शेतकरी हैराण झालेत, शेतकरी पिके वाळू लागल्यामुळे दुःखी आहे . त्यामुळे या भागात गेल्या 45 दिवसापासून पाणी नाही, ही शेतकऱ्यांची अडचण समजून या भागातील टेम्भू योजनेचे पाणी लवकर पाणी चालू करावे अन्यथा कराड विटा रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.