वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
जगभरात ट्रव्हल, पर्यटन आणि विमान उद्योगातून जवळपास 6.2 कोटी लोकांना रोजगार प्राप्ती होते. परंतु या क्षेत्रांना कोरोनामुळे लॉकडाउन केले आहे. याचा फटका वरिल क्षेत्रांना बसत आहे. यामुळे जगातील जवळपास 2.5 कोटी लोकांचे रोजगार धोक्मयात आल्याचे अनुमान आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून (आयएटीए) सादर केलेल्या अहवालात मांडले आहे. प्राप्त अहवालानुसार लॉकडाउनमुळे विमान प्रवासात मोठी घसरण झाली आहे.
कमाईत घट
संपूर्ण वर्षभराच्या कमाईचा विचार केल्यास लॉकडाउनच्या मुळे मागील वर्षात 2019च्या तुलनेत चालू वर्षात 2020मध्ये प्रवासी महसूल 44 टक्क्मयांनी घसण्याची भीती आहे. यामध्ये 2020 रोजी प्रवासी महसूलातून विमान कंपन्यांना तब्बल 252 अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे संकेत आहेत. यासोबतच 2020मधील दुसऱया तिमाहीची स्थिती बिकट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे देशातील विमान उद्योगाला दररोज 150 कोटीपेक्षा अधिकचे नुकसान होते. प्रतिदिन देशात 4 हजार आणि 500 आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली जात असयाची. यात एकटय़ा दिल्लीत 900 पेक्षा अधिक उड्डाण केली जातात. यामुळे भारतीय विमान उद्योग 75 ते 80 हजार कोटी रुपयापेक्षा नुकसान होण्याची शक्मयता व्यक्त केली आहे. यामुळे महसूल 40 टक्क्मयांनी घरण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.