प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी राष्ट्रीय टॅक्स प्रॅक्टीशनर्स डे साजरा करण्यात आला. अनगोळ रोड येथील न्यू उदय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्ये÷ कर सल्लागार विरय्या मोतीमठ, राजप्रभू धोतरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते टॅक्स प्रॅक्टीशनर्सचे संस्थापक व्ही. बी. होंबळ यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अध्यक्ष एच. एम. हनगंडी यांनी स्वागत केले. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ट कर सल्लागार विरय्या मोतीमठ यांनी कराबाबत सविस्तर विवेचन केले. तर ज्येष्ट कर सल्लागार राजप्रभू धोतरे म्हणाले, टॅक्स प्रॅक्टीशनर्सची 1982 साली नेंद झाली आहे. तेव्हापासून संस्थापक होंबळ यांचा जन्म दिवस दरवषी टॅक्स प्रॅक्टीशनर्स डे म्हणून साजरा केला जातो.
याप्रसंगी किरण गावडे, विक्रम कोकणे, विनोद मुतगेकर, भरतेश मुरगुंडी, संजय केस्ती, प्रविण कुलकर्णी, जितेश कब्बूर, श्रीधर पाटील, श्रीनिवास कुरूंदवाड. पवनकुमार धोतरे यासह टॅक्स प्रॅक्टीशनर्सचे सदस्य उपस्थित होते. सचिव एस. आर. बाडगंडी यांनी आभार मानले.









