प्रतिनिधी/ मंडणगड
देव्हारे-कुडूक फाटा बोरखत येथे शनिवारी ट्रक्टरने समोरून येणाऱया दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गोविंद शिवाजी चव्हाण हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, धडक दिल्यानंतर ट्रक्टरचालक गाडी जागेवर ठेऊन पळून गेला.
या अपघाताची खबर देव्हारे येथील ग्रामस्थ अमर देवळेकर यांनी चव्हाण यांच्या कुटुंबास तत्काळ दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक उत्तम पीठे आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी त्यांच्या पोलीस व्हॅनमधूनच जखमीस तत्काळ मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व येथे प्रथमोपचार करून अधिक उपचाराकरिता मुंबई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, या अपघातास कारणीभूत ट्रक्टरचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.









