बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील महिला, महिला हक्क कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधीमंडळाने कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष प्रमिला नायडू यांची भेट घेतली. २० फेब्रुवारी रोजी पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांना बेकायदेशीरपणे अटक केल्याप्रकरणी ही भेट घेण्यात आली.
दिल्ली राज्य महिला आयोगासंदर्भात आमच्या राज्य आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी करणारे निवेदन सादर केले. तसेच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करण्याची मागणी केली. हरयाणाचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांच्यावर द्वेषपूर्ण ट्विट केल्याबद्दल तसेच सोशल मीडियावर तिच्यावर द्वेषयुक्त,चुकीची माहिती पसरवणाऱ्या सोशल मीडियावर त्वरित कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.









