बेंगळूर/प्रतिनिधी
‘टूलकिट’ प्रकरणात २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्त्या दिशा रवीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान दिशाच्या अटकेबाबत दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठविली आहे आणि जेव्हा तिला तिच्या पसंतीचा वकील का पुरविला जात नव्हता अशा विषयावरील अहवाल मागविला आहे.
माध्यमांच्या वृत्ताची दखल घेत मंगळवारी पॅनेलने निवेदनात म्हटले आहे की, दिशा रवीला तिच्या पसंतीचा वकील नसताना दिल्लीतील कोर्टात हजर करण्यात आले.
केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारा निषेध टूलकिट तयार करुन सामायिक केल्याच्या आरोपाखाली शनिवारी दिल्ली पोलिसांनी बेंगळूर येथून तिला अटक केली.