वृत्तसंस्था/ ऍडलेड
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक (1065) धावा बनविणारा फलंदाज बनला आहे. बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या सुपर 12 फेरीतील सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करीत लंकेच्या महेला जयवर्धनेच्या सर्वाधिक धावांचा (1016) विक्रम मागे टाकला.
33 वर्षीय कोहली पाचव्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळत असून सातव्या षटकात त्याने जयवर्धनेचा विक्रम मागे टाकला. त्याने 80 हून अधिक धावांची सरासरी व 130 हून अधिक स्ट्राईकरेटने या धावा जमविल्या आहेत. त्याने एकूण 12 अर्धशतके नोंदवली असून त्यापैकी दोन अर्धशतके यावेळच्या स्पर्धेत केली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतही त्याने सर्वाधिक धावा जमविल्या असून कर्णधार रोहित शर्माने 3811, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिलने 3531, पाकचा कर्णधार बाबर आझमने 3239 धावा जमविल्या आहेत.









