रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन दुखापतीमुळे बाहेर, भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठीही संघ जाहीर
जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बवूमा दुखापतीतून सावरला असून ऑस्ट्रेलियात होणाऱया आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी त्याची फेरनिवड केली गेली आहे. यापूर्वी जून महिन्यात भारताविरुद्ध टी-20 मालिकेदरम्यान त्याला डाव्या ढोपराची दुखापत झाली होती. द. आफ्रिकेने वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर करताना 3 राखीव खेळाडू देखील निवडले आहेत. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन डाव्या बोटाला झालेल्या प्रॅक्चरमुळे खेळू शकणार नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. इंग्लंडविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्यात त्याला सदर दुखापत झाली होती.
यापूर्वी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत लक्षवेधी योगदान दिलेल्या 22 वर्षीय ट्रिस्टन स्टब्जला द. आफ्रिकेने संधी दिली. मात्र, यंदा आयपीएलसाठी करारबद्ध असलेल्या, पण, राष्ट्रीय टी-20 संघात अद्याप पदार्पण न केलेल्या नवोदित डेव्हॉल्ड ब्रेविसला जागा मिळू शकलेली नाही. द. आफ्रिकेचा संघ या महिनाअखेरीस भारताविरुद्ध सरावाची टी-20 मालिका खेळणार असून त्यानंतर उभय संघात ऑक्टोबरमध्ये 3 वनडे होतील.
टी-20 वर्ल्डकप संघ ः तेम्बा बवूमा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक, रिझा हेन्ड्रिक्स, हेन्रिच क्लासेन, केशव महाराज, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नॉर्त्झे, वेन पार्नेल, डेव्हॉन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, रिली रॉस्यू, तबरेझ शमसी, ट्रिस्टॅन स्टब्ज.
राखीव खेळाडू ः बियॉर्न फॉर्च्युइन, मार्को जान्सन, अँदिलो पेहलुकवायो.
भारताविरुद्ध मालिकेसाठी संघ ः बवूमा (कर्णधार), डी कॉक, हेन्ड्रिक्स, क्लासेन, केशव महाराज, जानेमन मलान, मॅरक्रम, एन्गिडी, नॉर्त्झे, पार्नेल, पेहलुकवायो, प्रिटोरियस, रबाडा, शमसी.
भारत-द. आफ्रिका मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / वेळ / ठिकाण
28 सप्टेंबर / पहिली टी-20 / सायं. 7.30 वा. / तिरुवनंतपूरम
2 ऑक्टाबर / दुसरी टी-20 / सायं. 7.30 वा. / गुवाहाटी
4 ऑक्टोबर / तिसरी टी-20 / सायं. 7.30 वा. / इंदोर
6 ऑक्टोबर / पहिली वनडे / दुपारी 1.30 वा. / लखनौ
9 ऑक्टोबर / दुसरी वनडे / दुपारी 1.30 वा. / रांची
11 ऑक्टोबर / तिसरी वनडे / दुपारी 1.30 वा. / दिल्ली
ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकप ः 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर









