18 डिसेंबरपासून होणार सुरुवात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) तब्बल 16,000 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची पुनर्खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरची समभाग खरेदी ही येत्या 18 डिसेंबर रोजी प्रारंभ होणार असून पुढे 1 जानेवारी 2021 पर्यंत चालू राहणार असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीतून सांगितले आहे.
टीसीएसच्या पात्र समभागधारकांनी 5,33,33,333 समभाग पुनर्खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मागील महिन्यात दिली आहे. यासाठी कंपनी प्रति समभाग 3,000 रुपये पेमेंट करणार असून त्या पेमेंटचे एकूण मूल्य हे 16,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक होणार आहे. कंपनीने यावेळी माहिती देताना म्हटले आहे, की सेबीच्या नियमावलीच्या आधीन राहून पुनर्खरेदी विनिमय 2018 च्या तुलनेत ते पात्र असणाऱया समभागधारकांना 15 डिसेंबरच्या अगोदर सादरीकरण पत्र पाठविणार आहे.
‘जेपी’कडून समभाग खरेदी
जेपी मॉर्गन फंडने टीसीएस कंपनीचे 247 कोटी रुपयांचे समभाग खुल्या बाजारात खरेदी केले असल्याचे समजते. 2 हजार 199 प्रति समभाग याप्रमाणे जेपी मॉर्गन कंपनीने 11.23 लाख समभाग खरेदी केले आहेत.









