मुंबई
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने नॅशनल क्वॉलीफायर टेस्ट सर्वांसाठी खुली केली आहे. या टेस्टच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणाऱया नव्या उमेदवारांना भरतीसाठी संधी उपलब्ध होणार आहे. ही प्रमाणीत परीक्षा टीसीएसच्या आयओएन प्लॅटफॉर्मवर घेतली जाणार असून यात मिळालेले गुण हे दोन वर्षे ग्राहय़ धरले जाणार आहेत. इतर फर्मकरीता ही टेस्ट उमेदवार भरतीसाठी उपयोगाची ठरेल. पहिली टेस्ट 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान घेतली जाणार आहे.









