प्रतिनिधी /सातारा
महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे सर्व स्तरावर ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परिक्षा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर डीएसएड प्रथम वर्षाचा निकाल (2019-20) ही अंतर्गत मूल्यमापनाद्वारे देण्यात आला. सध्या सर्व परिक्षा ऑनलाईन स्तरावर होत असुनसुध्दा डी.एल.एड परीक्षा ऑफलाईन स्वरूपात नोव्हेंबर 2021 मध्ये होतील असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या घाईघाईत घेण्यात येणाऱया टीईटी परिक्षेपासुन वंचीत रहावे लागणार आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा याबाबतचे निवेदन विद्यार्थ्यांच्या वतीने उपशिक्षणाधिकारी चोपडे यांना देण्यात आले.









