क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
ठळकवाडी शाळेच्या सभागृहात टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीने 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे आनंद चव्हाण यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या याप्रसंगी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा प्रथमच विद्यार्थीविना शिक्षकांच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. सी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक विवेक पाटील, सोमशेखर हुद्दार, एच. बी. पाटील, जयसिंग धनाजी, उमेश मजुकर, पूजा मुचंडी, अनिता पाटील, अशोक बुडवी, आर. बी. परीट, प्रवीण पाटील, उमेश बेळगुंदकर, बी. जी. सॉलोमान, अर्जुन भेकने, सिल्वीया डिमेलो, विनायक नेर्लेकर उपस्थित होते.









