ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
लोकप्रिय व्हिडीओ ऍप टिक टॉक वर अमेरिकेच्या लष्कराने बंदी घातली आहे. त्यामुळे आता अमेरिकेतील लष्कराचे जवान टिक टॉक हे ऍप वापरू शकणार नाहीत. टिक टॉक ऍप हे चीनमधील एका कंपनीने तयार केले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या लष्कराचे म्हणणे आहे की, चीनच्या या व्हिडीओ ऍपमुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचू शकतो.
येथील मिलिट्री डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, लष्कराचे प्रवक्ते Robin Ochoa यांनी सांगितले की, टिक टॉक एक सायबर धमकी सारखेच आहे. टिक टॉक ऍप अमेरिकेतील हेरगिरी करण्यासाठी वापरले जाऊ शकते, असे लष्कराचे म्हणणे आहे.
गेल्या महिन्यात अमेरिकेच्या नौदलाने आपल्या मेंबर्संना टिक टॉक ऍपला सरकारद्वारे दिलेल्या डिव्हाईसने डिलीट करायला सांगितले आहे. तसेच, रिपोर्टनुसार, कोणतेही ऍप डॉऊनलोड करण्याआधी सावधानता बाळगण्याचा सल्ला, संरक्षण विभागाने आपल्या कर्मचाऱयांना दिला आहे.









