नवी दिल्ली
: चीनचे शॉर्ट व्हीडीओ शेअरिंग ऍप टिकटॉकवर अमेरिकेत प्रतिबंधाची चिंता लागून राहिली आहे. यातून बचाव करण्यासाठी कंपनी नवीन योजना आखण्याची तयारी करत आहे. टिकटॉकची सहयोगी कंपनी बाइटडांस अमेरिकेतील व्यवसाय विकण्याचा विचार करत आहे. यात सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने रस दाखवला आहे.
आणखीन काही कंपन्यांनी टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. टिकटॉककडून अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याचा अंदाज मांडला जात आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टला हा व्यवहार करता येणार का याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने टिकटॉकची सहयोगी कंपनी बाइटडांस विकत घेण्याचा इरादा व्यक्त केला असून यासंदर्भात मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारीही दर्शवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
टिकटॉकचे मूल्य 20 ते 40 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. त्यामुळे अनेक कंपन्या ही किंमत देत हा व्यवसाय आपल्याकडे घेण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.









