प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात कोरोना रुग्णांची अतोनात वाढ झाल्यामुळे येत्या आठ †िदवसांसाठी कडक टाळेबंदी लागू करण्याचा इरादा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी उद्योग प्रतिनीधींनी वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेतली असता. त्यांनी रत्नागिरी जिह्यातील एमआयडिसी पूर्ण पणे सुरु ठेवण्याचा विचार असल्याचे सांगितले. याविषयी लवरकरच लेखी आदेश जारी होतील असेही या अधिकाऱयांनी सांगितले.
रत्नागिरी येथील लघुउद्योजक संघटनेचे सचिव राजू सावंत यांनी सांगितले कि आधीच टाळेबंदी मुळे उद्योजक बेजार झाले आहेत. उत्पादन व विक्रि आघडीवर असंख्या आव्हाने उभी राहिली आहेत. असे असताना रत्नागिरी जिह्यात नव्याने टाळेबंदी घट्ट करणे अडचणींचे ठरेल. काही उद्योजक विपरीत परिस्थितीमुळे आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत.
ते पुढे म्हणाले जिल्हाप्रशासनाने उद्योगिक वसाहतींच्या वर टाळेबंदी लागू करु नये विसकटलेली आर्थिक घडी पुन्हा बसण्याच्या प्रयत्नाला तो मोठा धक्क बसेल. प्रशासनातील अधिकारी या परिस्थितीचा अंदाज घेऊन एमआय†िडसीला प्रस्तावित टाळेबंदीतुन वगळतील अशी खात्री आहे. कामगारांना कारखान्यात कामावर येण्याची मुभा असली पाहिजे. अन्यथा ती मोठी अडचण ठरेल.
सेमवारी काही उद्योजकांनी जिल्हा प्रशासनातील महत्वाच्या अधिकाऱयांची भेट घेतली. या भेटीमध्ये अधिकाऱयांनी सांगितले की रत्नागिरी जिह्याकरीता आठ दिवसांची टाळेबंदी प्रस्तावित असुन त्यातुन औद्योगिक वसाहतीला वगळण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भात लेखी आदेश लवकरच जारी करण्यात येतील.









