वाळपई / प्रतिनिधी
लॉकडाउनचा फायदा घेत सत्तरी तालुक्मयातील होंडा पंचायत क्षेत्रातील सोलये चौगुले खाण कंपनीच्या क्षेत्रांमध्ये गुप्तपणे सुरू असलेले खाणीवरील दुरुस्ती काम पुन्हा एकदा ग्रामस्थांनी बंद पाडले आहे .
याखाणीचे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारचा ग्रामस्थांनी दिला आहे .यामुळे चौगुले खाण कंपनीवर छुपापद्धतीने सुरू केलेल्या कामाचा पडदा स्थानिक ग्रामस्थांनी उघडला आहे .
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील होंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील सोलये याठिकाणी कार्यरत असलेल्या चौगुले खाण कंपनीची वाहतूक गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली होती. सदर वाहतूक पावसाळी मोसमात सुरू करू नये अशा प्रकारची मागणी व विनंती खाणग्रस्त भागातील नागरिकांनी सरकारच्या संबंधित यांच्याकडे केली होती .तसे झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा प्रकारचा इशारा देण्यात आला होता .मात्र याग्रामस्थां®³ाा विनंतीला केराची टोपली दाखवीत या कंपनीने खनिज मालाची वाहतूक भर पावसामध्ये सुरू केली होती.
दोनवेळा ही वाहतूक ग्रामस्थांनी आक्रमकपणे बंद केले होती. पावसाळी मोसमात याभागात वाहतूक करणे म्हणजे सर्वसामान्यांना धोका निर्माण करण्या सारखे असून भागातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरत असून यामुळे सर्वसामान्य मोठा धोका निर्माण होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला होता.
यामुळे याभागातील वाहतुकीला प्रखरपणे विरोध करून दोनवेळा रास्तारोको करून ही वाहतूक अडविली होते. याची दखल घेत स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करीत सरकारच्या मामलेदार उपजिल्हाधिकारी पोलीस व खाण संचालनालय यांच्या प्रतिनिधीकडून या खाण परिसराची पाहणी करण्यात आली होती. यावेळी स्थानिकांनी अनेक प्रकारच्या मुद्यावर बोट धरून सदर खनिज वाहतूक म्हणजे स्थानिकांचा मोठा धोका निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला होता .यामुळे याभागातून कोणत्याही परिस्थितीत खनिज मालाची वाहतूक सुरू करू नये अशा प्रकारची मागणी केली होती. गुरुवारी अशाच प्रकारे या भागातून होणारी खनिज मालाची वाहतूक स्थानिकांनी रोखून धरले होती. यामुळे कंपनीसमोर पेच निर्माण होऊन कंपनीने वाहतूक बंद केलेली आहे. सध्या खाण कंपनीचा ताबा सरकारकडे आहे. सरकारकडून या भागातील खाण कंपनीमध्ये काम सुरू करणे किंवा कोणत्याही प्रकारच्या दुरुस्ती कामासाठी सरकारच्या परवानगीची गरज आहे. असे असतानाच चौगुले खाण कंपनीने याभागातील खाण परिसरामध्ये रस्ते रुंद करणे व इतर स्वरूपाच्या कामाला सुरुवात केली आहे .सध्या कोरोना रोगाच्या महामारीचा गैरफायदा उठवित आज अशाच प्रकारच्या कामाला मशीनरी वापरून सुरुवात करण्यात आली होती. यासंदर्भाची माहिती मिळताच स्थानिक नागरिक याखनिज खाणीवर जाऊन हे काम बंद पडले आहे. एका बाजूने सरकार कोरोना रोगाची महामारी पसरू नये यासाठी टाळेबंदी करीत आहेत. दुसऱया बाजूने अशाप्रकारे सुरू करण्यात आलेले काम म्हणजे खरोखरच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भागातील नागरिकांनी व्यक्त केलेली आहेत. यामुळे आज मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी खाणीवर धाव घेऊन हे काम बंद पडले असून कामासाठी वापरण्यात आलेल्या मशीनच्या चालकांना गंभीर स्वरूपाची तंबी दिलेली आहे. पुन्हा या भागांमध्ये काम सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे.









