नवी दिल्ली
दागिने आणि घडय़ाळाच्या क्षेत्रातील अग्रेसर कंपनी टायटनच्या चिफ फायनान्शीयल ऑफिसरपदी नव्याने अशोक सोंथालिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कंपनीने स्वदेश बेहरा यांची चिफ पिपल ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती टायटनकडून देण्यात आली आहे. 1 जुलैपासून कार्यभार सांभाळणारे नवे सीएफओ सोंथालिया हे चार्टर्ड अकैंटंट असून 30 वर्षाचा त्यांना धोरणात्मक वित्त योजना, व्यवसाय विकास, वित्त आणि लेखा या खात्यातील कामाचा गाढा अनुभव आहे.









