शैक्षणिक क्षेत्रात कंपनीचे कार्य : ऍपच्या आधारे विद्यार्थ्यांना मिळते माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शैक्षणिक ऍपमध्ये कार्यरत असणारी बायजूस कंपनीमध्ये न्यूयॉर्कमधील हेज ऍण्ड फंड कंपनी टायगर ग्लोबल मॅनेजमेन्ट यांच्याकडून 20 कोटी डॉलरची (1421 कोटी रुपये) गुंतवणूक करण्यात आली आहे. या गुंतवणुकीसह देशातील तिसऱया क्रमाकांची सर्वात मोठय़ा स्टार्टअप बायजूसचे बाजारी मूल्य 45 टक्क्यांनी वाढून 8 अब्ज डॉलर्सच्या (56,862 कोटी रुपये) घरात पोहोचले आहे.
मोठय़ा गुंतवणूकदारांची गुंतवणूक
2011 मध्ये स्थापन झालेली बायजूसकडून नॅसपर्स, टेनसेंट, वरलिनवेस्ट, चैन-झुकरबर्ग इनिशिएटीव्ह, सिकोएया कॅपिटल, लाइटस्पीड वेंचर पार्टनर्स आणि आरिन कॅपिटल यासारख्या गुंतवणूकदारांनी जवळपास 995 दशलक्ष डॉलर(7071.42 कोटी रुपये) गुंतवले आहेत. कन्झुमर इंटरनेट स्पेसमधील टायगर ग्लोबल यांचाही एक कार्यक्रम गुंतवणूकरांमध्ये समावेश असणारी कंपनी असून भारतामधील 14 कंपन्यांमध्ये यांनी गुंतवणूक केलेली आहे.
प्रवास बायजूसचा
बायजूसची सुरुवात रविंद्रन यांनी केरळमधील आपल्या गावात फक्त 2 लाख रुपयांची गुंतवणूक करुन कोचिंग क्लास सुरु करुन केली होती. यातून अधिक अधिक लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याची युक्तीच्या आधारे त्यानी 2011 मध्ये बायजूस नावानी कंपनीची सुरुवात केली.








