नवी दिल्ली
देशातील मोठी पोलाद उत्पादक कंपनी टाटा स्टीलले आपल्या पोलाद उत्पादनात वाढ केली आहे. जुलै ते सप्टेंबर कालावधीत कंपनीने पोलाद उत्पादनात 7 टक्के वाढ केली आहे. जुलै-सप्टेंबर कालावधीत कंपनीने 7.78 दशलक्ष टन इतके उत्पादन घेतले आहे. तर मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 7.25 दशलक्ष टन इतके उत्पादन घेतले होते. कंपनीच्या एकत्रित विक्रीत मात्र या अवधीत 6 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.









