क्योरफिट हेल्थकेअरमध्ये 550 कोटी रुपयांची गुंतवणूक- हिस्सेदारीबाबत कोणताही खुलासा नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा समूहाने आपले ई-कॉमर्स सेगमेंट मजबूत करण्यासाठी डिजिटल विभागासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाच्या डिजिटल विभागाने दिलेल्या माहितीनुसार कंपनी फिटनेस स्टार्टअप क्योरफिट हेल्थकेअरमध्ये जवळपास 550 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. परंतु सदरच्या गुंतवणुकीमधून प्राप्त होणाऱया हिस्सेदारीचा कोणताही खुलासा केलेला नाही.
कंपनीने सांगितल्याप्रमाणे क्योरफिटचे संस्थापक आणि सीईओ मुकेश बन्सल टाटा डिजिटलसोबत जोडले आहेत. त्यांना टाटा डिजिटलचे अध्यक्ष बनविण्यात येणार आहे. यासह क्योरफिटमध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिका सांभाळणार आहेत. ई-कॉमर्सच्या ट्रेडिंगच्या विस्तारासाठी टाटा समूह अशा कंपन्यांचे अधिग्रहण करत राहिला आहे. जो भांडवलाच्या अभावामध्ये मजबूत कामगिरी करत राहिला आहे.
2025 पर्यंत मजबूत स्थिती
भारतामध्ये फिटनेस ऍण्ड वेलनेस बाजार 20 टक्क्यांप्रमाणे विकसित होत आहे. यामध्ये 2025 पर्यंत भारताच्या फिटनेस बाजाराचा विस्तार हा 12 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये गुंतवणुकीसह क्योरफिट प्रो ऍक्टिव्ह मॅनेजमेंटच्या वातावरणात टाटा डिजिटलच्या विस्तारास मदत मिळणार आहे. गुंतवणुकीसह टाटा डिजिटल आणि क्योरफिट हेल्थकेअरच्या दरम्यान करार करण्यात आला आहे, अशी माहिती टाटा डिजिटलने दिली आहे.
टाटा डिजिटलसोबत जोडणे हा चांगला अनुभव
बन्सल यांनी म्हटले आहे, की टाटा डिजिटलसोबत जोडले जाणे आणि त्यांच्या टीमसोबत काम करणे ही आमच्यासाठी महत्वपूर्ण बाब असल्याचे म्हटले आहे. कारण बन्सल यांनी फॅशन स्टार्टअप मिंत्राची सुरुवात केली होती.









