पुढील महिन्यापासून बुकिंग सुरु
नवी दिल्ली
वाहन निर्मितीमधील दिग्गज कंपनी टाटा मोर्ट्सने आपल्या नवीन एसयूव्ही सफारीचे अनावरण केले आहे. सदर गाडीचे बुकिंग हे पुढील महिन्याच्या 4 तारखेपासून सुरु होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सफारीत डी8 प्लॅटफॉर्मची तयारी करण्यात आली आहे. ज्याचा वापर लँड रोव्हरमध्ये केला जातो. सदरचा प्लॅटफॉर्म भविष्यामध्ये या इलेक्ट्रिक स्वरुपात सादर करण्यात येणाऱया ऑल-व्हील ड्राईव्ह संस्करणामध्ये हे वाहन बाजारात आणले आहे.









