नवी दिल्ली : वाहन निर्मितीमधील दिग्गज कंपनी टाटा मोर्ट्सकडून एंट्री लेव्हल हॅचबॅक टियागो नवीन स्वरूपात सादर करण्यात आली आहे. या गाडीची दिल्लीमधील एक्स शोरुम किमत 5.99 लाख रुपये असल्याची माहिती आहे. यावेळी दिलेल्या माहितीनुसार नवीन स्वरूपातील एक्सटीएमध्ये ऑटोमेटिव्ह ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
टियागो मॉडेलचे सर्व क्षेत्रातील बाजारांमधून स्वागत होत असून भारतामधील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणाऱया वाहनांची लोकप्रियता वेगाने वाढत जात असल्याचे टाटा मोटर्सचे विपणन प्रमुख विवेक श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.
सदरचे मॉडेल हे भारतीय वाहन बाजारात मोठय़ा प्रमाणातील असणाऱया स्पर्धात्मक वातावरणास टक्कर देण्याची क्षमता कायम राखणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. विविध पर्यायात वाहन घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.









