सामदेन व्हेईकल्स प्रा. लिमिटेडची मदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोर्ट्स आता आपल्या प्रवासी वाहनांची नवीन श्रेणी भूतानच्या बाजारात उतरवणार आहे. कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार भूतानमधील सामदेन व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत आपली वाहने विक्री करणार आहे. सामदेन हे भूतानमधील सर्वात मोठी वाहन विक्रेते आहेत.
टाटा मोर्ट्सचे प्रवासी वाहनांचे प्रमुख (आंतरराष्ट्रीय व्यापार)मयंक बालदी यांनी म्हटले आहे, की भूतान आमच्या व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असणार आहे. नवीन पीढीच्या बीएस 6 श्रेणीतील प्रवासी वाहनांच्या सादरीकरणासोबत सदरच्या बाजारात आपला व्यवसायाचा पाया अधिक मजबुत करण्यासाठी कंपनीचा पुढाकार असणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीसह डिझाइन, सुरक्षेच्याबाबतीत कंपनीची वाहने अग्रेसर असून आरामदायी वाहन चालवण्याचा अनुभव भूतानमधील ग्राहकांना मिळू शकणार आहे.
प्रमुख मॉडेलचा समावेश
आता टाटा मोर्ट्स भूतानमध्ये येणाऱया काळात नव्या आवृत्तीच्या टियागो, टिगोर, अल्ट्रोज, नेक्सन, हॅरियर आणि सफारी या वाहनांची विक्री करणार असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.









