नवी दिल्ली
देशभरामध्ये टाटा पॉवरच्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची संख्या 1,000 च्या घरात पोहोचली आहे. कंपनीने या संदर्भात नुकतीच माहिती दिली आहे. कंपनीनं दिलेल्या अधिकच्या आकडेवारीनुसार टाटा पॉवरच्या ग्राहकांसाठी कार्यालये, मॉल्स, हॉटेल, किरकोळ दुकाने आणि अन्य ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासह तब्बल 10,000 होम ईव्ही चार्जिंग केंद्रे उभारली आहेत. ज्यामध्ये आपले वाहन चार्जिंग करता येणार आहे. टाटा पॉवरचे पहिले चार्जिंग केंद्र मुंबईत उभारले असून यासह टाटा पॉवरची चार्जिंग केंद्रांची 180 शहरांमध्ये लवकरच सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.









