सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी सादर : नफा 371 कोटींवर
मुंबई : टाटा पॉवरने सप्टेंबर तिमाहीचा अहवाल नुकताच सादर केला आहे. कंपनीची जवळपास या तिमाहीत 10 टक्क्यांनी नफा कमाई वाढून 371 कोटी रुपयांवर राहिली आहे. जी मागील वर्षात समान तिमाहीत 339 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. दुसऱया तिमाहीमध्ये एक्साइडचा नफाही 3.81 टक्क्यांनी वधारला आहे.
दुसऱया तिमाहीमध्ये टाटा पॉवर समूहाचा महसूल 15 टक्क्यांनी वाढून 8,413 रुपये कोटी झाला आहे. जो मागील वर्षातील समान तिमाहीत 7,329 कोटी रुपये होता. कंपनीच्या माहितीनुसार महसूलात वाढीमुळे टीपी सेंट्रल ओडिशा डिस्ट्रीब्युशन लि.चे आणि इंजिनिअरिंग, प्रिक्योरमेंट व कंस्ट्रक्शन सोबतचे अधिग्रहण थांबले आहे.









