नवी दिल्ली
टाटा कॅपिटल ग्रोथ फंड जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी लवकरच बायोकॉन बायोलॉजिक्स मध्ये 225 कोटी रुपयांना 0.85 टक्के हिस्सेदारी अधिग्रहण करणार आहे. या क्यवहारामुळे बायोकॉन बायोलॉजिक्सचे मूल्य 3.5 अब्ज डॉलर होणार आहे. शुक्रवारी बायोकॉनने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. बायोकॉन बायोलॉजिक्सचे संचालक मंडळ टाटा कॅपिटल ग्रोथ फंडासह टाटा कॅपिटलच्या प्राथमिक इक्विटी गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. प्रास्तविक करारासोबत टाटा कॅपिटल ग्रोथ फंड तीन कोटी डॉलरच्या गुंतवणुकीसोबत काही प्रमाणात हिस्सा खरेदी होणार आहे.









