डबल सिलेंडर तंत्रज्ञान व सनरुफ व एअरबॅग्ज: देशातील पहिली कार असणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोटर्सने प्रिमियम हॅचबॅक सेगमेंट अल्ट्रोज सीएनजी आवृत्तीसाठी बुकिंग सुरू केले आहे. 21,000 मध्ये ही कार बुक करता येणार असल्याची माहिती आहे. कंपनीने अद्याप या कारची किंमत जाहीर केलेली नाही. ही कार मे महिन्यात लाँच होणार असल्याचे संकेत आहेत. अल्ट्रोझ सीएनजीचे वैशिष्ट्या म्हणजे ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानासह येणारी देशातील पहिली कार राहणार असल्याची माहिती आहे.
या तंत्रज्ञानामध्ये 60-लिटर क्षमतेचे डबल-सिलेंडर टाकी सेटअप (30-30 लिटरचे दोन सिलिंडर) मिळेल. यामुळे अल्ट्रोजला इतर सीएनजी कारच्या तुलनेत अधिक बूट स्पेस मिळेल. कंपनीने 17 एप्रिल रोजी अल्ट्रोज सीएनजीचा टीझर रिलीज केला होता. कंपनीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये कारचे प्रदर्शन केले होते.
इंजिन, पॉवर आणि मायलेज
कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 84 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, हे इंजिन सीएनजी मोडवर 76 बीएचपी आणि 97 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाईल, तर रेग्युलर पेट्रोल व्हेरियंटमध्ये 5-स्पीड एटीएम गिअरबॉक्सचा पर्यायही मिळणार असल्याची माहिती आहे.









