वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त उद्योग टाटा मार्कोपोलो मोर्ट्स लिमिटेडमधील (टीएमएमएल) आपल्या भागीदारीतील हिस्सेदारी टाटा 100 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे, अशी माहिती टाटा मोर्ट्सने गुरुवारी शेअर बाजाराला दिली आहे. याचाच अर्थ या संयुक्त उद्योगातून मार्कोपोलो बाहेर पडणार आहे.
भारतात सक्षम उद्योग चालविणे आणि नवीन व्यवसायाची रणनीती आखण्यासाठी मार्कोपोलो एस. ए. यांनी संयुक्त उद्योगातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये संयुक्त भागीदारीतील आपली 49 टक्के हिस्सेदारी टाटा कंपनीला विकण्याची योजना आखली आहे.
यासाठी मार्कोपोलो एस.ए. आणि टाटा मोर्ट्स यांच्यामध्ये हिस्सेदारी खरेदीसाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत टीएमएमएल संयुक्त उद्योगातील मुख्य 49 टक्के समभागावर आधारीत खरेदी करणार आहे. हा व्यवहार रोख रक्कमेत 99.96 कोटी रुपयांना होईल.
2006 पासून संयुक्त उद्योग
टाटा मार्कोपोलो मोर्ट्स लिमिटेड संयुक्त उद्योगाची सुरुवात 2006 मध्ये झाली आहे. यामध्ये टाटा मोर्ट्सची 51 टक्के आणि मार्कोपोलो एसएची हिस्सेदारी 49 टक्के राहिली आहे. जगभरात बस आणि मोठय़ा कोचची निर्मिती करणाऱया कंपन्यांमधील सर्वात मोठी कंपनी आहे.









