नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सने आपल्या नव्या इलेक्ट्रिक टिगोर इव्ही वाहनाचे बुकिंग सुरू केले आहे. ग्राहकांना सदरची कार घ्यायची असेल आणि बुकिंग करायचे असेल तर त्यासाठी आगाऊ 21 हजार रुपये भरावे लागणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर तसेच विक्रेत्याकडे नवी गाडी ग्राहकांना बुक करता येणार आहे. नेक्सॉन इव्ही नंतरची कंपनीची ही दुसरी इलेक्ट्रिक कार बाजारात येणार आहे.









