वागदरी दुरक्षेत्र नूतनीकरण व लोकार्पण सोहळा संपन्न
प्रतिनिधी / अक्कलकोट
कोरोना काळात सगळ्यात अगोदर सर्वात मोठी निधी टाटा कंपनीने दिली आहे. भारताच्या जडणघडणीत या कंपनीचे खूप मोठे योगदान आहे.केल्या अनेक वर्षापासून यांनी समाज हिताची कामे केली आहेत. विधायक कार्यासाठी आजवर हे पुढे राहिले आहेत.यांचे आदर्श संबंध विश्वाने घ्यावे असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
सोलापूर ग्रामीण पोलीस दल अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे अंकित वागदरी दुरक्षेत्र नूतनीकरण लोकार्पण सोहळा व टाटा व्हॉलीटरिंग विक १७ निमित्त महिला मेळावा दरम्यान त्या बोलत होत्या. प्रारंभी वागदरी पोलीस दुरक्षेत्र याठिकाणी पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते वृक्षारोपण दुरक्षेत्र नूतनीकरण लोकार्पण व संविधानाची उद्देशिकेच्या कोनशीलाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जमशेदजी टाटा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.व्यासपीठावर चीफ सोलर ऑपरेशन अँड मेन्टनन्स टाटा पॉवर कं लि मुंबई प्रशांत जोशी, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ संतोष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर,अक्कलकोटचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, झोनल हेड टाटा पॉवर कं लि महादेव साबळे, असोसिएट विश्वास सोनवले,संचालक बॉस्को ग्रामीण विकास केंद्र जॉर्ज दाब्रियो,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पोलीस अधीक्षक सातपुते म्हणाल्या की ,महिलांना पोलीस ठाणे म्हणजे माहेर वाटावे, आपल्या भावाकडे आल्यासारखे वाटावे,आमच्याकडून कोणताही भेद न ठेवता सहकार्य मिळेल.गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर मात्र योग्य उपचार आमचे कर्मचारी करतील. वागदरी पंचक्रोशीतील लोकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले की वागदरी पोलीस दुरक्षेत्र दुरुस्ती व नुतनीकरणासाठी साडे दहा लाख रुपयांची मदत केली. त्यांच्यामुळेचे पोलीस चौकीचे रुपडे पालटले आहे.
यावेळी टाटा कंपनीने केलेल्या सहकार्यामुळे पोलीस विभागाने त्यांचा मानपत्र देऊन सन्मान केला.उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्री परमेश्वर यात्रा व पर्व समिती वागदरी यांच्यातर्फे पोलीस अधीक्षक सातपुते यांचा यथोचित सत्कार करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, प्रदीप जगताप, मलप्पा निरोळे,सिध्दराम बटगेरी, वागदरी बिट अंमलदार विपीन सुरवसे, अंगद गीते, धनराज शिंदे, गजानन शिंदे,शरद चव्हाण, गजानन गायकवाड, सीताराम राऊत,अंकुश राठोड,वीरभद्र कोलाटी चिदानंद उपाध्ये,अंबादास कोले यांच्यासह अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, आरोग्य विभाग, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, शालेय विद्यार्थी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









