प्रतिनिधी / बेळगाव
अनेक भागातील नागरिक पाणी मिळविण्यासाठी भटकंती करत आहेत. दुष्काळी भागात तर नागरिकांना घागरभर पाण्यासाठी भटकावे लागते. मात्र, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोणतीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येथील मुजावर गल्लीतील नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. मात्र, या टाकीला चावी नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या दुर्लक्षपणामुळे रोज पाण्याची टाकी भरल्यावर हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पाण्याचा होत असलेला अपव्यय थांबविण्यासाठी या ठिकाणी चावी बसवावी, अशी मागणी होत आहे.









