शिरढोण / वार्ताहर –
टाकवडे ( ता. शिरोळ ) येथील त्या संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्याने मोकळा श्वास घेतला. तालुक्याचे सर्व लक्ष या संशियताच्या रिपोर्टर कडेच लागले होते. दरम्यान त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्व सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे.
संशयित हा मुंबईला गेला होता त्याला टोल नाक्यावर होम कोरोण टाइण चा शिक्का मारण्यात आला. त्यानंतर तो आपल्या घरातच होता . त्याला दहा दिवसानंतर ताप व खोकला लागल्याने त्याला कोलापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल केले .
दरम्यान टाकवडे गांवात संशयित असल्याचे समजताच आरोग्य राज्यमंत्री डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोजक्या लोकांसोबत आढावा बैठक घेवून कोरोना बाबतची कशा प्रकारे खबरदारी घ्यावी या बाबत माहिती दिली . नागरिकांनी भीवून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सुचना केल्या .दरम्यान संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजताच टाकवडेसह तालुक्यान मोकळा श्वास घेतला .
संशयिताच नातलग शिरढोण येथे असल्याने तो गावाकडे आल्याची बातमी पसरताच नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली . यावेळी प्रा. आ. उपकेंद्राचे डॉ. बबलू सनदी यांनी एकूण नऊ लोकांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. यावेळी पोलिस पाटील, अनुराधा जाधव, तलाठी सोळंकुरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला .
टाकवडे येथील माणुसकी फौंडेशने लोकांना उपयुक्त औषधे , दुध , किराणा माल घरपोच करण्यासाठी गर्दी टाळू न कार्यकर्त्यांनी नियोजन बध्द कार्य हाती घेतले . घरात बसून फोन करायचा व्हॉटसपवर वस्तूची यादी टाकायची आणि कार्यकर्त्यांनी पटकन सगळी यंत्रणा लावायची या उपक्रमामुळे माणुसकी फौंडेशनच्या कार्याचे कौतुक होत आहे.
Previous Articleकोरोना जनजागृतीसाठी बार्शीत पोलिसांचा रूट मार्च
Next Article मुणगे येथे ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण









