प्रतिनिधी / सैनिक टाकळी
टाकळी वाडी येथील सध्या राहणार इचरकंजी प्रशांत चंद्रकांत निर्मळे हे इंडियन आर्मी मध्ये पंजाब फिरोजपुर येथे सेवा बजावत होते. त्यांना तब्बल नऊ महिन्यानंतर दोन महिन्याची सुट्टी मिळाली होती ते पंजाब मेल एक्सप्रेस मधून प्रवास करत होते. रविवार दिनांक 25 रोजी भोपाल ते इटारसी दरम्यान बुधनी या छोट्याशा खेड्यात जवळ त्यांचा ट्रेनमधून तोल जाऊन ते खाली पडले.
त्यांच्या सोबत असणारे इतर चार जवान त्या डब्यातच होते. प्रशांत अजून का आला नाही म्हणून शोधत होते त्या ठिकाणी असणारे प्रवाशांनी इथून खाली हात निसटून तुमचा माणूस खाली पडला आहे. असे सांगितले त्यावेळी त्या जवानानी रेल्वे प्रशासनाला याबाबतची लगेच माहिती कळवली तो परिसर जंगली आणि दुर्गम असल्यामुळे तेथे शोध काळात कार्यास अडथळे निर्माण होते. दुसऱ्या दिवशी स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रशांतला शोधण्यात यश आले. परंतु त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. याची माहिती प्रथमता तेथील पोलिसांनी सात महार रेजिमेंटला कळवली.
प्रशांत निर्मळ यांनी पत्नी विद्या निर्मळे आणि त्यांची कन्या स्वरा (६) यांच्याशी दोन दिवस आधी व्हिडिओ कॉल करून मला दोन महिन्याची सुट्टी मिळाली आहे. आणि मी घरी येत आहे असे बोलणे झाले होते. परंतु 26 तारखेला आर्मी हेडकॉटर त्यांच्या पत्नीला तुमचे मिस्टर रेल्वेतून खाली पडून रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाला आहे. असा फोन आला, त्यावेळी त्या जागीच कोसळल्या त्यांना दुःख अनावर झाले आणि तीने एकच हंबरडा फोडला यावेळेस प्रशांतची मुलगी स्वरा (६) आणि दुसरी मुलगी नवनीत ही दीड वर्षाचीअसल्यामुळे आईने फोडलेला हंबरडा बघून त्या दोन्ही मुली घाबरल्या होत्या. त्यांना आपली मम्मी का रडते हे कळत नव्हते त्यांच्या या आवाजाने तेथील गल्लीतील लोक जमा झाले. त्यावेळीस त्या इचलकरंजी येथे राहात होत्या त्यांनी टाकळी वाडी येथे आपल्या सासरी सासरे चंद्रकांत निर्मळे यांना फोनवरून आपल्या पतीची मयताची बातमी सांगितली आणि येथेही आक्रोश रडारडी सुरू झाली. टाकळीवाडी गावत बघता बघता बातमी पसरली आणि गावावर शोककळा पसरली.
प्रशांत चे वडील पार्वती सूतगिरणी यड्राव येथे नोकरीस होते प्रशांतचा जन्म२१/११/१९८२ रोजी टाकळी वाडी तालुका शिरोळ येथे झाला त्यांचे शिक्षण पहिली ते चौथी कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी येथे पाचवी ते दहावी पार्वती विद्या मंदिर यड्राव येथे झाले त्यांनी आपले शिक्षण बारावीपर्यंत पर्यंत पूर्ण केले शाळेत असल्यापासूनच त्यांना देशसेवा विषयी ओढ होती त्यांचा मोठा भाऊ निशांत निर्मळे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था प्राध्यापक आहेत प्रशांत आजोबा निर्मळे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र नंतर राजाराम रायफल मध्ये सैनिक होते.प्रशांत यांचे चुलते
रमेश निर्मळे हे सुद्धा कॅप्टन पदावरून सैन्यात सेवा बजावून निवृत्त झाले आहेत.
घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी कमवा व शिका या धोरणाचा अवलंब करून आपले शिक्षण पूर्ण करून इंडियन आर्मी सात महार रेजिमेंट मध्ये 2001 मध्ये रुजू झाले.त्यांचे ट्रेनिंग मध्ये प्रदेश(सागर) येथे झाले नागालँड, हैदराबाद, सियाचीन, पंजाब, पश्चिम बंगाल येथे सेवा बजावली आहे.
त्यांचा पार्थवी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता टाकळीवाडी येथे आणण्यात आला त्यांची गावातून अंतयात्रा काढण्यात आली गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फेला रांगोळी काढून गावातील महिलांनी आणि नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून त्यांच्यावर पुष्पअर्पण केले यावेळी गावातील तरुणांनी ‘अमर रहे अमर रहे प्रशांत निर्मळे अमर रहे ‘अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता आबालवृद्धांच्या डोळ्यातील पाणी वाहत होते.आज सकाळपासून गावातील सर्व व्यवहार बंद करून दुखवटा पाळण्यात आला होता.
त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात बंदुकीच्या गोळ्या झाडून सलामी देण्यात आली प्रशांत निर्मळ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सैनिक टाकळी येथील आजी-माजी सैनिकांनी आणि गावातील नागरिकांनी मोठी गर्दी होती.










