नवी दिल्ली
ऑनलाईन अन्न पुरवठा करणारी प्रसिद्ध कंपनी झोमॅटोचा मार्च 2020मध्ये समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात महसूल 39.4 कोटी डॉलर (2,960 कोटी रुपये) राहिला आहे. एक वर्षाच्या अगोदर हा महसूल 1440 कोटी रुपयांवर राहिला होता. परंतु या आकडेवारीच्या तुलनेत दोन टक्के वाढ महसूल वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. याचदरम्यान कंपनीचा तोटा 29.3 कोटी डॉलरवर राहिला आहे.









